येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

सोमवार, ३ जून, २०१९

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अंदरसुल येथील चारा छावणीस भेट
--------------------
चारा छावण्यांतील जनावरांची देखभाल करण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी - छगन भुजबळ

येवला,दि.३ (प्रतिनिधी) : राज्यात दुष्काळाची परिस्थिती भयावह असून अजून किमान एक महिन्याच्या कालावधीसाठी चारा छावणीतील जनावरांची काळजी घेण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत वेळच्यावेळी उपलब्ध करून द्यावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. आज त्यांनी येवला तालुक्यातील अंदरसुल येथील चारा छावणीस भेट दिली.

यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख, माणिकराव शिंदे,अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मकरंद सोनवणे, अशोक मेंगाने, देविदास शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, येवला बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर,  प्रकाश वाघ, नवनाथ काळे, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, संतोष खैरणार, भाऊसाहेब धनवटे उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी अंदरसुल येथील चारा छावणीची पाहणी करून येथील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी कमी मनुष्यबळामुळे चारा छावणीची देखभाल करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. यावेळी  छगन भुजबळ यांनी चारा छावणीतील समस्या जाणून घेतल्या.अंदरसुल चारा छावणीत ५०० हुन अधिक जनावरे असल्याने त्यांची देखभाल करण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे शेतकरी घेऊन येत असलेल्या  जनावरांसाठी येवला येथील गोशाळेत व्यवस्था करावी आशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच चारा छावणीतील जनावरांची देखभाल करण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी असून सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा