येवला मतदार संघात मुलभूत सुविधांची १ कोटी ११ लाखांची १२ कामे मंजूर
येवला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातुन येवला विधानसभा मतदार संघातील विविध मुलभूत सुविधांच्या विकासकामांसाठी १ कोटी ११ लक्ष रुपयांची एकूण १२ कामे राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यात गावांतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटकरण, सामाजिक सभागृह,पेव्हर ब्लॉक, गावांतर्गत सुशोभिकरण यासारख्या विविध कामांचा समावेश आहे.
येवला तालुक्यातील तांदूळवाडी, महादेववाडी धामणगाव,बाळापुर, सत्येगाव, आडसुरेगाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, धुळगाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ७ लक्ष तर निफाड तालुक्यातील हनुमाननगर आणि ब्राम्हणगाव विंचूर मारुतीमंदिर परिसर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी ७ लक्ष, शिवापूर (पाचोरे बु) येथे सभामंडप बांधकाम करणे १० लक्ष, पाचोरे खुर्द येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, पाचोरे खुर्द येथील गावांतर्गत सुशोभिकरण करण्यासाठी १० लक्ष, गोळेगाव येथे सभामंडप बांधकामासाठी १० लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजना टप्पा १ मधून येवला विधानसभा मतदार संघातील विविध मुलभूत सुविधांसाठी येवला तालुक्यातील ६ कामांसाठी ५७ लक्ष तर निफाड तालुक्यातील ६ विकासकामांसाठी ५४ लक्ष असे एकूण १ कोटी ११ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून या कामांना लवकरच सुरुवात होणार असून येथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा