येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

येवला तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

येवला (प्रतिनिधी) : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73वा वर्धापन दिन मास्क, सॅनीटायजर व सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालयांमधून या निमित्ताने व्यसनमुक्तीची शपथ घेतल्या गेली.
शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम तहसिल कार्यालयात संपन्न झाला. प्रांताधिकारी सोपान कासार यांचेहस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी तहसिलदार रोहिदास वारूळे यांचेसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
पंचायत समिती कार्यालयात सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांसह कर्मचार्‍यांनी व्यसनमुक्तीचे शपथ घेवून तंबाखूमुक्त कार्यालय करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास गट विकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी  उपस्थित होते.
येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने  शहरातील टिळक मैदान येथे सेवा निवृत्त सैनिक नवनाथ दाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रितम पटणी, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, चांगदेव खैरे, रांजेद्र घोडके, दत्तात्रय चव्हाण, नंदकुमार शिंदे, मुकुंद पोफळे, राजे आबासाहेब शिंदे, भगवान रसाळ, महेश भांडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
येवला नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी व्यसनमूक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूकर, उपमुख्याधिकारी पाटील यांचेसह नगरसेवक, नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. 
येवला तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांचे हस्ते तर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सैनिक पाल्य प्रकाश माळी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास प्रांताधिकारी सोपान कासार, तहसिलदार राोहिदास वारूळे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, संदीप कोळी आदी उपस्थित होते.  
येवला येथील पालकमंत्री भुजबळ यांचे कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा राजश्री पहिलवान यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, राकाँ तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, प्रविण पहिलवान, गणेश पंडित, समीना शेख, गोटू मांजरे, सचिन कळमकर, नितीन आहेर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
येवला मर्चंटस् को-ऑप बँकेत चेअरमन अरूण काळे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांना कोविड प्रतिबंधक काढ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक मंडळासह कर्मचारी उपस्थित होते.
-----------
येवला महाविद्यालयात 
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. या प्रसंगी कोरोनावर यशस्वी रित्या मात केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गौतम बाफणा, जनता विद्यालयाचे लिपीक राजेंद्र मिसाळ यांचा शाल पुष्प व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गमे यांचे प्रसंगोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे नियोजन क्रिडा संचालक प्रा. शिरिष नांदुर्डीकर, सोमनाथ कुवर, प्रल्हाद जाधव यांनी केले. प्रा. ठका सांगळे यांनी सुत्रसंचालन केले. तर प्रा. शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले
कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, कनिष्ठ प्रमुख शांताराम पानपाटील सर्व विभाग प्रमुख कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
-------
एन्झो केम हायस्कुल
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झो केम हायस्कुल व श्रीमान शेठ गं. छ. उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांचे  हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दीपक आहेर हा सैन्य दलातून नुकताच सेवानिवृत्त झाल्याबद्दल, न्यू इंग्लिश, धामणगाव विद्यालयाचा माजी विद्यार्थी करण माळी याचा पी-नल रक्त गट असल्याने केरळ येथे रक्तदान करून एका लहान मुलीचे प्राण वाचविल्याबद्दल, प्रा. बाळासाहेब हिरे यांची राज्यशास्त्र विषय अभ्यासमंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, वनिता वाघ  यांचे आकाशवाणीवर इ.5 वी विज्ञान विषयासाठी अभ्यासमाला निवडझाल्याबद्दल, कोरोना योद्धा म्हणून आसावरी जोशी यांचा तर वाढदिवसा निमित्त उत्तम पुंड, संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व अतिथी परिचय प्राचार्य किशोर जगताप यांनी करून दिला. सुत्रसंचलन उत्सव प्रमुख संदीप जेजुरकर यांनी केले. नियोजन श्रीमती रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास कार्यक्रमास संस्था सचिव सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष डॉ. मनिष गुजराथी, संचालक प्रफ्फुल गुजराथी, सचिन कळमकर, श्रीकांत पारेख, अशोक शहा, उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक दत्तकुमार उटवाळे, उच्च माध्यमिक प्रमुख कैलास धनवटे,  आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
------
स्वामी मुक्तानंद विद्यालय
श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात स्वातंत्र्यदिनी संस्थेचे संचालक सुधांशु खानापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव दिपक गायकवाड हे होते.  प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अशोक नाकील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, संचालक संजय नागडेकर, डॉ. किरण पहिलवान, डॉ. गोस्वामी, उपप्राचार्य अंबादास ढोले, पर्यवेक्षक मुरलीधर पहिलवान, गजेंद्र धिवर यांसह प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. 
-----------
मायबोली कर्णबधिर विद्यालय
समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात प्रतिष्ठानच्या संचालिका सुधाताई पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन उदय ऑफसेटचे संचालक अमितभाई पटेल, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे,शरद श्रीश्रीमाळ, सलिल पाटील, शंकर कुमावत उपस्थित होते. याप्रसंगी नुकतेच निधन झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संस्था हितचिंतक निवृत्ती हाबडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले तर आभार सुखदेव आहेर यांनी मानले. कार्यक्रमास हेमंत पाटील, मंदा पडोळ, संतोष कोकाटे, रेखा दुनबळे, नितिन कदम, रावसाहेब खराटे, रावसाहेब सोनवणे, विजय जाधव, मारूती पगारे, देवीदास पगारे, शोभा कदम आदी उपस्थित होते.
-----------
संतोष माध्यमिक विद्यालय 
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित राहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात प्राचार्य अरूण पैठणकर अरुण यांच्या हस्ते ध्वज पुजन तर पोलीस पाटील नितीन गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार वसंत वाघ यांनी केले. कार्यक्रमास मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
-------------
स्वामी विवेकानंद विद्यालय 
एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्था संचालक दिगंबर बाकळे व प्राचार्य अंबादास सालमुठे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेला कुणाल विजय बारहाते, बारावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेली मुस्कान शेख, गणित विषयात प्रथम आलेले प्रणव सातळकर व विशाल तुरकने यांचा रोख पारितोषिक देऊन यावेळी गौरव करण्यात आला. या निम्मीत्ताने आयोजित ऑनलाइन भाषण, काव्यलेखन, गीतगायन, निबंध स्पर्धांचा निकाल घोषित करण्यात आला. प्राचार्य सालमुठे, पर्यवेक्षक सुनिल मेहेत्रे व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवाजी खापरे यांची प्रसंगोचित भाषणे झाली. उत्सव प्रमुख विलास गोसावी यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार श्रीमती सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास माजी सरपंच विट्ठल जगताप, विजय बारहाते, दत्तु साप्ते आदींसह शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. 
--------
सरस्वती विद्यालय 
सायगाव येथील सरस्वती विद्यालयात माजी विद्यार्थी व स्वातंत्र सैनिक नवनाथ देवराम ऊशीर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष बबन ऊशीर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विष्णुपंत कुळधर, शिक्षक -पालक संघाचे उपाध्यक्ष  वसंतराव खैरनार उपस्थित होते. संस्थाध्यक्ष कुळधर, खैरनार, ऊशीर यांची प्रंसगोचित भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक  सी. बी. कुळधर यांनी केले.  सूत्रसंचलन सुरेश देवरे, बी. डी. पैठणकर यांनी केले. आभार अशोक शेलार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होतेे.
------
मानोरी बुद्रुक 
मानोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य अनिता शेळके यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच नंदाराम शेळके, मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, शिक्षक उमेश मुप्पीडवार, सदस्य महेश शेळके, आशा सुवर्णा भवर, अंगणवाडी सेविका संगीता कवीश्वर, सुरेखा वाघ, देवराम शेळके, नितीन शेळके, पोपट शेळके, सुनील शेळके, बाबासाहेब तिपायले, भाऊसाहेब फापाळे, आनंदा गायकवाड, प्रसाद वावधाने, बाळासाहेब वावधाने आदी उपस्थित होते.
---------------
अंदरसुल परिसर 
अंदरसूल परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये 
स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
ग्रामपालिकेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील शिवाजीराव देशमुख यांचे हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मुले येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचे हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मुली येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी सरपंच चैताली रवींद्र गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदकीय अधिकारी डॉ. आनंद तारु, लक्ष्मी महिला नागरी पंतसंस्थेत चेअरमन मंदाकिनी किसनराव धनगे व व्हाईस चेअरमन प्रमिला बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालिका  मंगला प्रकाश साबरे, प्रतिभा बाळासाहेब देशमुख, संगीता गणपतराव देशमुख, व्यवस्थापक मनोहर शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 
------------
राधिका इंग्लिश मिडीयम
अंदरसुल येथिल राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्था सचिव कुणाल धुमाळ याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यदिना निमित्ताने यावर्षी शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी डीजीटल पद्धतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सूत्र संचालन राजश्री गोसावी, आकाश खरास यांनी केले. तर वर्षा मते, अपर्णा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन वासंती खिरड, निर्मला शिकारे, दुर्गा परदेशी, सत्यजित पाटील, नासीर शेख यांनी केले होते. कार्यक्रमास प्राचार्या पलक धुमाळ, उप प्राचार्य शादाब शेख, सायली गाडीवान, पूजा झाल्टे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 
-------------
देशमाने परिसर 
देशमाने गाव परिसरात 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके तर प्राथमिक केंद्र शाळा व जनता विद्यालयातील प्रांगणातील ध्वजारोहण निवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माळवाडी प्राथमिक शाळेत अंबादास तळेकर व प्राथमिक शाळा देशमाने (खु) प्रांगणात मुख्याध्यापक कायस्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मावळते सरपंच विमलबाई शिंदे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आप्पासाहेब दुघड, रतनगीर गोसावी, गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश दुघड, केंद्रशाळा मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे,  जनता विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र पाखले, आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
जळगाव नेऊर परिसर
जळगाव नेऊर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र संचलित जनता विद्यालयात माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष जयाजी नाना शिंदे यांचे हस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे पूजनध्वजारोहण भारतीय सैन्यदलातील जवान दत्तात्रय तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक गुलाबराव कोकाटे यांनी केले. सुत्रसंचालन संपत बोरनारे  यांनी तर व आभार प्रदर्शन सुरेश शेळके  यांनी केले. कार्यक्रमास नामदेव गायकवाड, डॉ. कोकाटे, अशोक दाते, प्रकाश वाघ, तुकाराम शिंदे, कोंडाजी शिंदे, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, डी. एल. शिंदे, शिवाजी शिंदे आदीसह  शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक व ग्रामस्थ  उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत शालेय समिती अध्यक्ष भिमराव शिंदे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बाळनाथ बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
---------- -----------------------------------------------

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

अनलॉक । पुनश्‍च हरी ओम...

येवला तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढले

येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्‍च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढू लागले आहे. 
गेल्या तीन महिन्यात तालुक्यात चोर्‍यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोर्‍या दुचाकींच्या आहेत. याबरोबरच गेल्या काही आठवड्यांत छोट्या-मोठ्या चोर्‍यांच्याही अनेक घटना  घडल्याने नागरिकांनी आत्मनिर्भर होवून स्वत:च काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असणार्‍या लॉकडाऊनने बाजारपेठा व सर्वच उद्योगसधंदे बंद राहिले तर कोरोनाच्या भीतीने सर्वच घरातच बसून राहिल्याने उन्हाळ्यात चोर्‍यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अनलॉकचा पहिला टप्पा सुरु झाला आणि चोर्‍यांचे सत्र सुरू झाले. कोरोनाने पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण अजूनही कमी झालेला नसल्याने नेमका याचा फायदा चोरटे घेतांना दिसून येत आहे. 
मागील दोन आठवड्यात तालुक्यात शेळ्या, मोबाईल, घरफोडी, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील अनकुटे येथील एका टोळीने पालघरच्या व्यापार्‍याला कोपरगाव शिवारात लुटले, बाभूळगाव येथे किरण गायकवाड यांच्या घरापुढून दोन नव्या मोटारसायकली रात्रीतून चोरीला गेल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या आहेत. थळकर वस्तीजवळ एकजण मोबाईलवर बोलत असतांना त्याच्या हातातून मोबाईल हिसकावला गेला तर धामणगावला एका शेतकर्‍याच्या शेळ्या चोरीस गेल्या. गवंडगाव येथे मोटारसायकलीसह पेट्रोलपंपावर तीन हजार लिटर डिझेलची चोरी झाली. अंदरसूलला दळे वस्ती येथील पंढरीनाथ जाधव यांच्या मालकीच्या किराणा दुकानचे शटर वाकवून रोकड व किराणा माल चोरुन नेल्याची घटना घडली. कातरणी येथे संतोष कदम यांच्या घरातून चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सोने, पैशासह वस्तू नेल्या. 
मार्च ते जून महिन्या दरम्यान, शहर व तालुक्यात घराफोड्या व चोर्‍यांच्या 12 घटना घडल्या असून, दुचाकी चोर्‍या वीसवर गेल्या आहे. मात्र, दोन्ही पोलिस ठाण्यात 14 दुचाकी चोरीच्या नोंदी आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात एकही घटना घडली नसली तरी जून नंतर मात्र चोरीच्या दहावर घटना घडल्या आहेत. 
-------------

इच्छुकांची नेतेमंडळींकडे फिल्डिंग; राजकीय वातावरणात उष्मा

मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती

येवला : जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशासक नियुक्तीचे अधिकार दिले गेल्याने इच्छुकांसह समर्थकही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून प्रशासक नियुक्तीसाठी फिल्डिंग लावत आहे. 
नुकतेच येवला दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी,  ग्रामपचांयत ज्या पक्षाच्या ताब्यात आहे, त्याच पक्षाचे काम करणार्‍या योग्य व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमले जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जुलै ते डिसेंबर दरम्यान पाच वर्ष पूर्ण होउन मुदत संपणार्‍या ग्रामपंचातींच्या निवडणूका लांबल्या आहेत.  निवडणूका न घेता प्रशासक नियुक्त केले जाणार आहे. मात्र जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणारी ग्रामपंचायत ज्या पक्षाच्या ताब्यात असेल त्या पक्षाच्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्त केली जाणार असल्याचे सर्वसाधारण सूत्र आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालय, सेनेचे आमदार दराडे बंधू, संभाजी पवार आदी नेते मंडळींकडे इच्छुकांची व त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढू लागली आहे.
मुदत संपणार्‍या राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लांबवल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत सुरू रहावे यासाठी या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र, प्रशासक निवडीत अनेक अडचणी पाहता, ज्या पक्षाची ग्रामपंचातीत सत्ता आहे, त्याच पक्षाच्या योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा राजकीय तोडगा काढला गेला असल्याने गावोगाव राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. 
राज्यातील एप्रिल ते जूनमध्ये मुदत संपलेल्या एक हजार 566, तर जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींवर कलम 35 नुसार विस्तार अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. जुलै ते डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या राज्यातील 12 हजार 668 व जिल्ह्यातील 519 तर येवल्यातील 44 ग्रामपंचायतीं वरही प्रशासक नेमले जाणार आहेत. यातच शासनाने कलम 35 मध्ये अनेक तांत्रिक अडथळे असल्याने यात दुरुस्ती केली. मात्र नव्या अध्यादेशात शासनाने योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, असे म्हटले आहे. तर प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देवून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे सांगीतले आहे. 

---------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे निवडणूकीसाठी कंबर कसलेल्या मंडळींचा हिरमोड झाला आहे. आता प्रशासक नियुक्त करण्यात येणार असल्याने सर्वांच्या सहमतीने योग्य व्यक्तीची नियुक्ती व्हावी. असे झाल्यास निश्‍चितच गाव विकासास चालना मिळेल.  
- हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना
---------------------

कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शहरात संचारबंदी कडक करा - पालकमंत्री भुजबळ



उपाययोजना आणि नियोजनाबाबत येवला येथे आढावा बैठक 

येवला : शहरात रुग्णसंख्या दरमहा वाढत असून त्यावर पुढील आठ दिवसात नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले नाही तर कठोर पाऊल उचलावी लागनार असून प्रसंगी लॉकडाऊन करण्यात येईल असे सांगत ज्या भागात पेशंट अधिक आहे अशा भागात संचारबंदी कडक करण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी आपापले काम चोख बजावण्याबत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहर व परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असल्याने अधिक लक्ष देण्याची गरज असून अधिकाऱ्यांनी त्याबाबत नियोजन करावे. अतिदक्षता म्हणून येवला शहर आणि तालुक्यात कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधें पुरविण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेंटमेंट झोन मध्ये कडक नियोजन करण्यात यावे असे सांगत मास्क न वापरणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा प्रसंगी पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शहर व ग्रामीण भागात ज्या भागात पेशंट सापडले आहे त्या भागात संचारबंदी कडक करण्यात येऊन त्या परिसरातील कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना औषधे पुरविण्यात यावीत.  लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठविण्यात यावे ऑक्सिजन बेडसवर डिसीएचसी मध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवण्यात यावे. त्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या. नगरसुल येथे संपूर्ण २८ बेड ला कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करावी त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


येवला शहरात कोरोना सोबतच इतर साथ रोगांचा पावसाळ्यात शिरकाव होऊ नये यासाठी अतिदक्षता म्हणवून प्राधान्याने शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन शहर नियमित स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपालिकेच्या  मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी शेतकरी खरीप हंगाम पीक कर्जवाटप, मका खरेदी व खत वाटपा बाबत आढावा घेतला. त्यानुसार येवला तालुक्याला असलेल्या ८० कोटींच्या इष्टांक पैकी ३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. येवल्याला कर्जमाफीची १५० कोटी तर निफाड तालुक्याला १३३ कोटी रुपये रक्कम प्राप्त होणार असून ही संपूर्ण रक्कम पिककर्जासाठी वितरित करावी अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मका खरेदीसाठी गोडाऊन शिल्लक नसेल तर तातडीने गोडाऊन भाड्याने घेऊन सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी करावी, खरेदी प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी काट्यांची संख्या वाढवावी व खरेदी प्रक्रिया बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यासोबत काळाबाजार व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, निफाडचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप कराड, कार्यकारी अभियंता उमेश पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
-- 

बारावी परीक्षा । येवल्यात विद्यार्थीनींचीच बाजी


एन्झोकेमची तेजल सोनवणे गणितात तर मुक्तानंदच्या तीन विद्यार्थीनी संस्कृतमध्ये राज्यात प्रथम

येवला, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रु/मार्च 2020 मधील बारावी परीक्षेचा आज ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे. शहरासह तालुक्यात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थीनींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. एन्झोकेम कनिष्ठ महाविद्यालयाच्या तेजल सोनवणेला गणितात तर स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या पांढरे हर्शलीनी बाळू, नाकोड मानसी संजीव, शेजपुरे सिध्दी राजेश या तीन विद्यार्थीनींना संस्कृतमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

शहरातील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान शेठ गंगाराम छबीलदास उच्च माध्यमाध्यमिक विद्यालयाची तेजल विश्‍वास सोनवणे हिने या परिक्षेमध्ये गणीत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शाखानिहाय प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी असे, वाणिज्य शाखा : कु. अनकाईकर रेणुका शशिकांत (87.38% अकाऊंट विषयात 98 मार्क), चि. इंगळे निखिल वाल्मिक (83.38%), चि. पवार प्रसाद मिलिंद (82.92% अकाऊंट विषयात 98 मार्क). कला शाखा : कु. मोरे नूतन आप्पासाहेब (87.23%), कु. जोरवर मोनाली उत्तम (84.15%), कु. देशमुख दीपाली बाबासाहेब (79.23%). विज्ञान शाखा : चि. पवार शुभम आबासाहेब (87.23%), कु. सोनवणे मोनाली ईश्वर (84%3), कु. उटवाळे साक्षी दत्तकुमार (83.69%). गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून कु. सोनवणे तेजल विश्वास गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व प्राचार्य किशोर जगताप तसेच सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
---
स्वामी मुक्तानंद विद्यालय
येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विज्ञान शाखेचा विद्यार्थी ओंकार सुनील रायजादे 91.41% गुण मिळवुन तालुक्यात प्रथम तर ऋतुजा संजय नागडेकर ही द्वितीय आली आहे. संस्कृत भाषेत पैकीच्या पैकी गुण मिळवून राज्यात पांढरे हर्शलीनी बाळू, नाकोड मानसी संजीव, शेजपुरे सिध्दी राजेश या तीन विद्यार्थीनी प्रथम आल्या आहेत. 
बारावी वाणिज्य मध्ये पुनम बसवराज जिरोळे तालुक्यात प्रथम, कला शाखेत   विद्यालयात प्रथम आरती आनंदा गायकवाड, द्वितीय अर्चना बाळासाहेब शेळके, किमान कौशल विभागात विद्यालयात प्रथम पवन शिवाजी उशीर, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीत प्रसाद बापुराव उगले प्रथम, सीएमएलटी विभागात प्रथम सरला सुदाम कुळधर, कॉम्पुटर टेक्नॉलॉजीत प्रथम विशाल भाऊसाहेब साळवे आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंस्थाचालकांसह प्राचार्य अशोक नाकील आणि सहकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.
---
अंदरसूल एमएसजीएस कॉलेज 
अंदरसूल मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्सची भाग्यश्री देशमुख ही विद्यार्थीनी  वाणिज्य शाखेत 88 टक्के गुण मिळवून तालुक्यात वाणिज्य विभागात प्रथम आली आहे. महाविद्यालयाचा निकाल शेकडा 87 टक्के इतका लागला असून यात विज्ञान शाखेचा 100 टक्के, वाणिज्य 92 टक्के व कला शाखेचा 62 टक्के निकाल लागला आहे.   
शाखानिहाय प्रथम तिन क्रमांकाचे विद्यार्थी असे, विज्ञान शाखा : जाधव दिपाली अशोक (84.31%), साळुंके पूनम हरिभाऊ (83.08%), सैंदर अथर्व भास्कर (80.77%). वाणिज्य शाखा :  देशमुख भाग्यश्री भाऊसाहेब (88 %),  वाकचौरे विशाल संजय (79.08%), सोनवणे साक्षी दिपक (76.15%). कला शाखा : उंडे कृष्णा वाल्मिक (72%), म्हस्के अर्चना पांडुरंग (67.23%), दाभाडे सौरभ भाऊसाहेब (65.23%). यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, मुख्याध्यापक अल्ताफ खान आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
---
विद्या इंटरनॅशनल स्कूल 
विद्या इंटरनॅशनल स्कूलजुनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात आस्था वैभव पटेल (87.23%) प्रथम, तनिशा निलेश पटेल (85%) द्वितीय तर पूर्वा महेश भांडगे (76%) तृतीय आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
---
येवला महाविद्यालय
येवला कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल 68.68% तर वाणिज्य शाखेचा निकाल 96.29% लागला आहे. शाखानिहाय पहिले तिन विद्यार्थी असे, कला शाखा :  प्रथम पठाण अख्तर फुलखान (78.46%), द्वितीय भोरकडे प्रतिक्षा निशिकांत (67.69%), तृतीय पवार रोशनी अंबादास (65.38%).  वाणिज्य शाखा : प्रथम काळे आरती सुनील (73.38%), द्वितीय जाधव प्राजक्ता नवनाथ (71.07%), तृतीय मढवई तेजस्विनी संजय (70.76%). यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, जनता विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब मामुडे आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
---
राजापूर विद्यालय
राजापूर येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्क्के लागला असन कला शाखेचा निकाल 98.42 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तिन विद्यार्थी असे, विज्ञान शाखा : प्रथम विंचु ईश्वर अशोक (88 %), द्वितीय चव्हाण भावना काशिनाथ (81.23%), तृतीय सानप शितल चिंधा (78.15%). कला शाखा : प्रथम चवडगिर  सीमा गुलाब  (78 30%), द्वितीय वाघ अर्चना श्रीधर (76.15%), तृतीय शेख मुस्कान अल्ताफ (76 .00 %)े. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालकांसह प्राचार्य पी. के. आव्हाड, पर्यवेक्षक डी. एन. सानप, विभाग प्रमुख बी. एस. दराडे आदींनी अभिनंदन केले आहे.
---
बाभूळगाव संतोष विद्यालय
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष श्रमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजची विध्यार्थीनी हर्षिता देशमुख हिने सर्वाधिक 89.38 टक्के मिळवत तालुक्यात दुसर्‍या तर बाभूळगाव केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के  तर कला शाखा निकाल 75 टक्के लागला असून महाविद्यालयाचा एकत्रित निकाल 95 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तिन विद्यार्थी असे,  विज्ञान शाखा : हर्षिता देशमुख (89.38 %) प्रथम, श्रुती आहेर (83.69%) द्वितीय तर सिद्धांत भड (81.84%) तृतीय. कला शाखा : प्रथम अश्विनी मोरे (76.30%), अश्विनी कांबळे (77.7 %) द्वितीय, प्रमिला ठोंबरे (70.92%) तृतीय. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाचालकांसह प्रचार्य गोरख येवले व शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे. 
---
रहाडी संतोष विद्यालय
जगदंबा एज्युकेशन सोसायटीच्या राहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 96.79% तर कला शाखेचा निकाल 99% लागला आहे.  विद्यालयात विज्ञान शाखेत नागरे ऋषीकेश रंगनाथ (84.61%) प्रथम तर कला शाखेत दिवे गायत्री उमेश (69.33%) प्रथम आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह प्राचार्य पैठणकर व शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे.
---
एरंडगाव विवेकानंद विद्यालय
एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 वी निकाल 81.57 % लागला आहे. विद्यालयात  शेख मुस्कान अन्सार (82.92%) प्रथम, उराडे योगिता श्रावण (77.23%) द्वितीय तर गोसावी कल्याणी शिवाजी (76.46%) तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालकांसह विद्यालयाचे प्राचार्य अंबादास सालमुठे आणि शिक्षकवर्गाने अभिनंदन केले आहे. 
---
जळगाव नेऊर जनता विद्यालय 
जळगाव नेऊर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय बारावी सायन्स शाखेचा निकाल 92.15 टक्के तर कला शाखेचा निकाल 75 टक्के लागला आहे. शाखानिहाय पहिले तिन विद्यार्थी असे, विज्ञान शाखा : प्रथम वैभव संपत शिंदे (75.69%), द्वितीय अक्षय नामदेव आथरे (73.53%), तृतीय सरला भास्कर शिंदे (73.07%). कला शाखा : प्रथम अर्चना राजेंद्र दरगुडे (68.46%),  द्वितीय कोमल रामभाऊ तांबे (64%), तृतीय चेतन मच्छिंद्र शिंदे (61.69%). यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एन. ए. दाभाडे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. 
-----------



रविवार, १७ मे, २०२०



कोरोना युद्ध

(दि.१०  मे २०२०  ते  दि. १६ मे २०२० पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा)


10 मे 2020

  • आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा, विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद, ठळक मुद्दे – आदिवासी विकास विभाग खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार , विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणणार. पुढील काळात फक्त आदिवासींशी संबंधित हिताच्या योजना राबवणार. यासाठी सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या केंद्रीय निधीच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेणार.
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत  एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा  तुरदाळ मोफत वाटप केली जाणार असल्याची, अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ यांची माहिती.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ३६६ गुन्हे दाखल.

११ मे २०२०

  • प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांची व्हीडिओ कॉन्फरन्स, ठळक मुद्दे –लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यावर ग्रीन झोन्समध्ये उद्योग – व्यवसाय सुरु. मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करा, परप्रांतीय मजुरांची वाहतूक सुरु करताना प्रत्येक राज्याने काळजी घेणे आवश्यक, अन्यथा कोरोना संसर्ग देशभर वाढू शकतो, महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली,  इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु, खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सूचना द्या,  सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा,  राज्याला ३५ हजार कोटींचा फटका बसला असून  जीएसटी परताव्यापोटी तसेच केंद्रीय कराच्या हिश्श्यापोटी संपूर्ण रक्कम लवकर मिळणे आवश्यक, कंटेनमेंट क्षेत्राकडे काटेकोर लक्ष, चाचण्यांची संख्या वाढवली, नेहरू सायन्स सेंटर,  रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरण, उपचाराची व्यवस्था, कोरोना प्रतिबंध करणाऱ्या औषध बनविणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन द्या. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करा, ज्या संस्था उपकरणे आयात करीत आहेत त्यांना सीमा शुल्कात सवलत द्या.  मुंबई-पुणे सारखा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स देशाच्या पातळीवर तयार करा, पोलिसांना  विश्रांती देण्याची गरज, त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम असल्याने ते आजारी पडून चालणार नाही  त्यामुळे  आवश्यकता भासेल तेव्हा केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा  ताण कमी होईल.  केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधा मिळाल्यास कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल.
  • रेड झोन वगळता राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने, 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, साडेसहा लाख कामगार कार्यरत. जेवढा विजेचा वापर तेवढेच देयक आकारण्याचा निर्णय, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सवलती, राज्यात विदेशी गुंतवणूक यावी, यासाठी वाटाघाटी सुरू.
  • महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो, डीपी म्हणून ठेवण्याच्या गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,३२,८४३ पासेस  पोलीस विभागामार्फत वितरित, २,५८,७९२ व्यक्ती क्वारंटाइन, दि.२२ मार्च ते १० मे या कालावधीत  १,०३,३४५ गुन्ह्यांची नोंद, १९,६३० व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २०७ घटना, ७४७ व्यक्तींना ताब्यात.

१२ मे, २०२०

  • कोरोनामुळे खासगी दवाखाने बंद असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणाऱ्या अडचण लक्षात घेऊन ऑनलाइन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू,  संपर्क- www.esanjeevaniopd.in वैशिष्ट्ये – रुग्णांकडून शुल्क आकारले जाणार नाही, ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उपलब्ध, रविवारी बंद. नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण, आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्णांचे उपचार, रुग्ण कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो.
  • कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषी अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याद्वारे जाहीर. कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन, कृषी पदविका (दोन वर्षे) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश, व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. कृषी तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल, व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुण लक्षात घेऊन, तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर ८ ते १५ जूनच्या दरम्यान घेण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश, त्याकरिता ५० टक्के गुण विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या चालू सत्राच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत देण्यात येतील उर्वरीत ५० टक्के गुण मागील सत्रांच्या घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारीत. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठवे सत्र) ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील, परीक्षेचा निकाल १५ जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध), भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतली जाईल. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पध्दत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मूल्यमापित केले जातील. शोधनिबंध सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ, पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी १ ऑगस्ट २०२० रोजी  आणि सातव्या सत्राची नोंदणी दि.१ जुलै २०२० रोजी केली जाईल. पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश दि. १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होतील.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ४ हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१२ घटना, ७५० व्यक्तींना ताब्यात.
  • अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत) एप्रिल व मे महिन्यातील एकूण २ किलो डाळीचे मोफत वाटप सुरु.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील  पात्र शिधापत्रिकाधारकांनी शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत http:// mahaepos.gov.in या संकेतस्थळावर जावे. तिथे Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकेकरीता देण्यात १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाइन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल क्रमांक dycor. ho.mum@gov.in यावर तक्रार नोंदवावी.       
  • राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची विक्रमी नोंद झाल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४५ ठिकाणी असलेल्या ६० कारागृहातील  ३५ हजार कैद्यांपैकी १७ हजार कैदी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती दिली. 
  • मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह,  येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद,नागपूर नाशिक  मध्यवर्ती कारागृहे ही आठ  कारागृहे लॉकडाऊन.

13 मे 2020

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३,४७,५२२ पासेस  पोलीस विभागामार्फत वाटप, २,९७,२८२ व्यक्तींना काँरंटाइन करण्यात आल्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची माहिती. 
  • राज्यातील ३९६४  रिलिफ कँम्पमध्ये  ३,८४,१८८ लोकांची व्यवस्था.
  • कोरोनामुळे पोलीस दलावर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या  वीस कंपन्यांची मागणी करण्यात असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
  • काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आवश्यक बैठका घेण्यास संमती देण्यात आल्याची, ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे पालन करुन या बैठका घेण्याचे निर्देश.
  • कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचा निर्णय. 
  • भारतीय जनजाती सहकारी विपणन संघ (ट्रायफेड) यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनाबाबत,केंद्रीय आदिवासी जनजाती मंत्री श्री. अर्जुन मुंडा यांचा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद.  मुख्यमंत्र्यांच्या वतीने आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा सहभाग. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील १५ लाख आदिवासी कुटुंबांच्या मदतीसाठी   राबवण्यात येत असलेल्या खावटी अनुदान  योजनेसाठी केंद्र शासनाने आर्थिक मदत देण्याची, श्री पाडवी यांची मागणी.

14 मे 2020

  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६  हजार गुन्ह्यांची नोंद, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २१८ घटना, ७७० व्यक्तींना ताब्यात. २२ मार्च ते १३ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,०६,५६९ गुन्ह्यांची नोंद, २०,१९५ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ०९ लाख ६९ हजार ०९४ रुपयांचा दंड, हेल्पलाइन १०० नंबरवर ९१,१९६ दूरध्वनी. अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,५३,४१४ पासचे वितरण. अवैध वाहतूक करणाऱ्या १२९६ वाहनांवर गुन्हे दाखल, ५७,४७९ वाहने जप्त, परदेशी नागरिकांकडून  झालेल्या व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद.
  • महाराष्ट्र सायबर विभागामार्फत३७९ गुन्हे दाखल,२०७ लोकांना अटक.
  • राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ , १६०२ नवीन रुग्णांचे निदान, ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले, ६०५९ रुग्ण बरे, २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

१५ मे २०२०

  • लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन, काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत आढावा. यावेळी राष्ट्रवादी खा. शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित.महत्वाचे मुद्दे – राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसाय सुरु, ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता प्रदान, ३५ हजार उद्योग सुरु, ९ लाख कामगार रुजू , परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु, पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु, उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेच्या वापरात ५० टक्के पर्यंत वाढ, परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यान्वित. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊन पुढील नियोजन आवश्यक, डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मोठी मदत.
  • मागासवर्गीयांसह विविध समाज घटकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना तसेच विविध विकासकामांचा 70% निधी कपात करण्यात आल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या थेट लाभांच्या योजनांचा वाटा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून देण्यात यावा अशी सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय  मुंडे यांची मागणी.
  • लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेवून छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश, हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू,  
  • मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र – २, ची पाहणी. यावेळी उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई उपस्थित. या ठिकाणी  १,२४० बेड क्षमता असणार.
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख ५६ हजार २३२ पासेस  पोलीस विभागामार्फत वितरीत, ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्ती क्वारंटाइन, २२ मार्च ते १४ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ०७ हजार २५६ गुन्ह्यांची नोंद, २० हजार २३७ व्यक्तींना अटक,  विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी १० लाख ७९ हजार ४९४ रुपयांचा दंड, पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २२९ घटना, त्यात ८०३ व्यक्तींना ताब्यात, हेल्पलाइन १०० नंबरवर ९१ हजार ७९० दूरध्वनी, हातावर क्वारंटाइन असा शिक्का असलेल्या ६७२ व्यक्तींना शोधून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी. अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३०४ वाहनांवर गुन्हे दाखल, ५७ हजार ६७० वाहने जप्त.
  • राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या २९ हजार १००, आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान, ५०५ कोरोनाबाधित रुग्णांची घरी रवानगी. ६५६४ रुग्ण बरे.
  •  कोविड संदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल, पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना, ८१२ व्यक्तींना अटक
  • २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह, २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह, ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये, ६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती. 

१६ मे २०२०

  • २२ मार्च ते १५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०८,४७९ गुन्ह्यांची नोंद, २०,६२६ व्यक्तींना अटक.
  • लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील २ लाख ४५ हजार ०६० कामगारांची १९१ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी करण्यात आल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून. यासाठी ५४.७० कोटी रुपये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग. राज्यात ३ हजार ८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगारांची व्यवस्था. श्रमिक ट्रेनचा तपशील- उत्तर प्रदेश (११७), राजस्थान(९), बिहार (२६), कर्नाटक (३), मध्यप्रदेश(२१), जम्मू (२), ओरिसा (७), झारखंड(५), आंध्र प्रदेश (१). भिवंडी ६, डहाणू १,कल्याण २, पनवेल १३, ठाणे ५, लोकमान्य टिळक टर्मिनस ३०, सीएसटी ३५, वसई रोड ७, पालघर ३, बोरिवली ९,बांद्रा टर्मिनस १८, अमरावती २, अहमदनगर २, मिरज ४, सातारा ४, पुणे १४, कोल्हापूर ९, नाशिक रोड ४, नंदुरबार ४, भुसावळ १, साईनगर शिर्डी २, जालना २, नागपूर ४, औरंगाबाद ६ , नांदेड १, कुर्डूवाडी १, दौंड १ या स्टेशन वरून श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.
  • लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागामार्फत ३९१ गुन्हे दाखल.
  • आतापर्यंत ११ हजार ३७९ एस.टी  बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध.

इतर

10 मे 2020

  • कृषी पंपांसाठी मार्च २०१८ पासून प्रलंबीत नवीन वीज जोडणीसाठीचे  धोरण लवकरच अंतिम करण्याची, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रशासनाला सूचना

११ मे २०२०

  • महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासह १० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल. अखेरच्या दिवसापर्यंत १४ उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल, विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान, नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची आणि पक्षांची नावे पुढीलप्रमाणे. श्री. संदीप सुरेश लेले (भा.ज.पा.), श्री. रमेश काशिराम कराड (भा.ज.पा.), श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी).श्री. राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.),श्री. राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष), श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भा.ज.पा.), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भा.ज.पा.), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भा.ज.पा.), डॉ. अजित माधवराव गोपचडे (भा.ज.पा).
  • धरणांची मान्सूनपूर्व तपासणी करण्यासाठी , धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तातडीने सादर करण्याचेमृद व जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख यांचे आदेश.
  • २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व  सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकवणे सक्तिचे केले जाणार, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा.

१२ मे, २०२०

  • विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी, १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध, एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध.

14 मे 2020

  • 'महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग' आणि 'इंटरनॅशनल जस्टीस मिशन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'बालकांचा ऑनलाइन पद्धतीने होणारा लैंगिक छळ थांबविण्यासाठी धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी' या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारचे (ऑनलाइन) चर्चासत्राचे  आयोजन. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा सहभाग. ऑनलाइन होणारे बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सामूहिक  प्रयत्नांची गरज असल्याचे श्रीमती ठाकूर यांचे प्रतिपादन
  • महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये 13 पैकी 4 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यासह  पुढील उमेदवारांची बिनविरोध निवड –  श्री. गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), श्री. प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), श्री. रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी). (शिवसेना), डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना).श्री. शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी).श्री. राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस). 

१५ मे २०२०

  • अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी, सामाजिक न्याय विभागामार्फत  6 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा निश्चित, त्यावरील वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीला पात्र ठरणार नाहीत. ही उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाखांपर्यंत वाढविण्याचे विचाराधीन, असल्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांची माहिती.
  • लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांमार्फत शेती उत्पादन विक्रीचे यशस्वी प्रयोग. या उत्पादनाला ब्रॅँडिंगची जोड दिल्यास शेत मालाला जास्त दर मिळेल. राज्यात ३५ हजार हेक्टरवर करण्यात येत असलेल्या सेंद्रीय शेतीचे बळकटीकरण करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे , राहुरी कृषी विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रशिक्षण समारोपात प्रतिपादन.

 १६ मे २०२०

  • संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांच्या निधनाबाबत, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शोक व्यक्त. एका व्रतस्थाची सावली हरपली, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण.
  • संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे दु:ख व्यक्त.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांची सविताताई दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

००००

शनिवार, २ मे, २०२०




Team DGIPR posted: " परप्रांतीय मजुरांना निरोप देताना पालकमंत्री छगन भुजबळ भावुक नाशिक दि. 2 मे (जिमाका) : परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती. त्यामुळेच तर आज रेल"

उत्तर प्रदेशचे 847 मजूर विशेष रेल्वेने घराकडे रवाना


परप्रांतीय मजुरांना निरोप देताना पालकमंत्री छगन भुजबळ भावुक

नाशिक दि. 2 मे (जिमाका) : परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती. त्यामुळेच तर आज रेल्वे सुटतांना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. गाडी सुटतांना या प्रवाशांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र, अशा घोषणा देवून एकप्रकारे नाशिकच्या प्रशासनालाच धन्यवाद दिले, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. या प्रवाशांना निरोप देताना पालकमंत्री देखील भावूक झाले होते.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व मजुरांना आज विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले. या गाडीला निरोप देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.

नाशिक शहरातील विविध निवारागृहात गेल्या दीड महिन्यापासून थांबून असलेल्या उत्तर प्रदेश येथील 847 कामगार, मजूरांना शनिवारी सकाळी नाशिक येथून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश लखनऊला रवाना करण्यात आले. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरूळ येथील मजूर होते.

श्री.भुजबळ म्हणाले, मुंबई येथून पायी चालत आलेल्या या परप्रांतीय मजुरांमध्ये लिंबू पाण्याचा व्यवसाय करणारे, दूध विक्रेते, वडापावचे व्यावसायिक होते. लॉकडाऊन जाहीर होताच हे सगळे पायीच गावाकडे निघाले होते. मात्र त्यांना नाशिक आणि इगतपुरी येथील निवारागृहात थांबवून तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यात त्यांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाश्ता अस सगळे पुरविले जात होते. या सर्वांची वेळोवळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये जे अजूनही कोरोना संशयित वाटत होते, त्यांना नाशिक येथेच थांबविण्यात असून त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत. उर्वरितांना आज या विशेष रेल्वेने सोडण्यात येत आहे. गाडीतही त्यांना सुरक्षित वावर ठेवत बसविण्यात आले आहे. सोबत दोन वेळेचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे.

कौतुकाची थाप

गेला दीड महिना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आरोग्य यंत्रणा यांनी या परप्रांतीय मजूरांची खूप काळजी घेतली, अशा शब्दात पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.

हे संकट लवकर दू होवो

या सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपण अपेक्षा करू हा कोरोना लवकरच महाराष्ट्रातून, भारतातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल, असा आशावादही पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

आत्मविश्वास दुणावला : सूरज मांढरे

नाशिक मधून आज उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. 847 नागरिकांना घेऊन जाणाऱ्या गाडीत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जेवण, बिस्कि‍टे सर्व काही देऊन ही गाडी निघाली आहे. रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद असा जयघोष केला. म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दलचा आत्मविश्वास आज दुणावला असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.

*****