येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

येवला तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

येवला (प्रतिनिधी) : शहर व तालुका परिसरातील विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73वा वर्धापन दिन मास्क, सॅनीटायजर व सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालयांमधून या निमित्ताने व्यसनमुक्तीची शपथ घेतल्या गेली.
शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम तहसिल कार्यालयात संपन्न झाला. प्रांताधिकारी सोपान कासार यांचेहस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी तहसिलदार रोहिदास वारूळे यांचेसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
पंचायत समिती कार्यालयात सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांसह कर्मचार्‍यांनी व्यसनमुक्तीचे शपथ घेवून तंबाखूमुक्त कार्यालय करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास गट विकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी  उपस्थित होते.
येवला शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने  शहरातील टिळक मैदान येथे सेवा निवृत्त सैनिक नवनाथ दाणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रितम पटणी, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, चांगदेव खैरे, रांजेद्र घोडके, दत्तात्रय चव्हाण, नंदकुमार शिंदे, मुकुंद पोफळे, राजे आबासाहेब शिंदे, भगवान रसाळ, महेश भांडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
येवला नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांनी व्यसनमूक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी संगीता नांदूकर, उपमुख्याधिकारी पाटील यांचेसह नगरसेवक, नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. 
येवला तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांचे हस्ते तर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य सैनिक पाल्य प्रकाश माळी यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास प्रांताधिकारी सोपान कासार, तहसिलदार राोहिदास वारूळे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, संदीप कोळी आदी उपस्थित होते.  
येवला येथील पालकमंत्री भुजबळ यांचे कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा राजश्री पहिलवान यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, राकाँ तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, प्रविण पहिलवान, गणेश पंडित, समीना शेख, गोटू मांजरे, सचिन कळमकर, नितीन आहेर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
येवला मर्चंटस् को-ऑप बँकेत चेअरमन अरूण काळे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांना कोविड प्रतिबंधक काढ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संचालक मंडळासह कर्मचारी उपस्थित होते.
-----------
येवला महाविद्यालयात 
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. या प्रसंगी कोरोनावर यशस्वी रित्या मात केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गौतम बाफणा, जनता विद्यालयाचे लिपीक राजेंद्र मिसाळ यांचा शाल पुष्प व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गमे यांचे प्रसंगोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे नियोजन क्रिडा संचालक प्रा. शिरिष नांदुर्डीकर, सोमनाथ कुवर, प्रल्हाद जाधव यांनी केले. प्रा. ठका सांगळे यांनी सुत्रसंचालन केले. तर प्रा. शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले
कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, कनिष्ठ प्रमुख शांताराम पानपाटील सर्व विभाग प्रमुख कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
-------
एन्झो केम हायस्कुल
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एन्झो केम हायस्कुल व श्रीमान शेठ गं. छ. उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांचे  हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दीपक आहेर हा सैन्य दलातून नुकताच सेवानिवृत्त झाल्याबद्दल, न्यू इंग्लिश, धामणगाव विद्यालयाचा माजी विद्यार्थी करण माळी याचा पी-नल रक्त गट असल्याने केरळ येथे रक्तदान करून एका लहान मुलीचे प्राण वाचविल्याबद्दल, प्रा. बाळासाहेब हिरे यांची राज्यशास्त्र विषय अभ्यासमंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, वनिता वाघ  यांचे आकाशवाणीवर इ.5 वी विज्ञान विषयासाठी अभ्यासमाला निवडझाल्याबद्दल, कोरोना योद्धा म्हणून आसावरी जोशी यांचा तर वाढदिवसा निमित्त उत्तम पुंड, संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व अतिथी परिचय प्राचार्य किशोर जगताप यांनी करून दिला. सुत्रसंचलन उत्सव प्रमुख संदीप जेजुरकर यांनी केले. नियोजन श्रीमती रणदिवे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास कार्यक्रमास संस्था सचिव सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष डॉ. मनिष गुजराथी, संचालक प्रफ्फुल गुजराथी, सचिन कळमकर, श्रीकांत पारेख, अशोक शहा, उपप्राचार्य संजय बिरारी, पर्यवेक्षक दत्तकुमार उटवाळे, उच्च माध्यमिक प्रमुख कैलास धनवटे,  आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
------
स्वामी मुक्तानंद विद्यालय
श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात स्वातंत्र्यदिनी संस्थेचे संचालक सुधांशु खानापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था सचिव दिपक गायकवाड हे होते.  प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अशोक नाकील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, संचालक संजय नागडेकर, डॉ. किरण पहिलवान, डॉ. गोस्वामी, उपप्राचार्य अंबादास ढोले, पर्यवेक्षक मुरलीधर पहिलवान, गजेंद्र धिवर यांसह प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. 
-----------
मायबोली कर्णबधिर विद्यालय
समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात प्रतिष्ठानच्या संचालिका सुधाताई पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणुन उदय ऑफसेटचे संचालक अमितभाई पटेल, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे,शरद श्रीश्रीमाळ, सलिल पाटील, शंकर कुमावत उपस्थित होते. याप्रसंगी नुकतेच निधन झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संस्था हितचिंतक निवृत्ती हाबडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले तर आभार सुखदेव आहेर यांनी मानले. कार्यक्रमास हेमंत पाटील, मंदा पडोळ, संतोष कोकाटे, रेखा दुनबळे, नितिन कदम, रावसाहेब खराटे, रावसाहेब सोनवणे, विजय जाधव, मारूती पगारे, देवीदास पगारे, शोभा कदम आदी उपस्थित होते.
-----------
संतोष माध्यमिक विद्यालय 
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित राहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात प्राचार्य अरूण पैठणकर अरुण यांच्या हस्ते ध्वज पुजन तर पोलीस पाटील नितीन गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार वसंत वाघ यांनी केले. कार्यक्रमास मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
-------------
स्वामी विवेकानंद विद्यालय 
एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्था संचालक दिगंबर बाकळे व प्राचार्य अंबादास सालमुठे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेला कुणाल विजय बारहाते, बारावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेली मुस्कान शेख, गणित विषयात प्रथम आलेले प्रणव सातळकर व विशाल तुरकने यांचा रोख पारितोषिक देऊन यावेळी गौरव करण्यात आला. या निम्मीत्ताने आयोजित ऑनलाइन भाषण, काव्यलेखन, गीतगायन, निबंध स्पर्धांचा निकाल घोषित करण्यात आला. प्राचार्य सालमुठे, पर्यवेक्षक सुनिल मेहेत्रे व शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवाजी खापरे यांची प्रसंगोचित भाषणे झाली. उत्सव प्रमुख विलास गोसावी यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार श्रीमती सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास माजी सरपंच विट्ठल जगताप, विजय बारहाते, दत्तु साप्ते आदींसह शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. 
--------
सरस्वती विद्यालय 
सायगाव येथील सरस्वती विद्यालयात माजी विद्यार्थी व स्वातंत्र सैनिक नवनाथ देवराम ऊशीर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष बबन ऊशीर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विष्णुपंत कुळधर, शिक्षक -पालक संघाचे उपाध्यक्ष  वसंतराव खैरनार उपस्थित होते. संस्थाध्यक्ष कुळधर, खैरनार, ऊशीर यांची प्रंसगोचित भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक  सी. बी. कुळधर यांनी केले.  सूत्रसंचलन सुरेश देवरे, बी. डी. पैठणकर यांनी केले. आभार अशोक शेलार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होतेे.
------
मानोरी बुद्रुक 
मानोरी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य अनिता शेळके यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोलीसपाटील आप्पासाहेब शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच नंदाराम शेळके, मुख्याध्यापक अगरचंद शिंदे, शिक्षक उमेश मुप्पीडवार, सदस्य महेश शेळके, आशा सुवर्णा भवर, अंगणवाडी सेविका संगीता कवीश्वर, सुरेखा वाघ, देवराम शेळके, नितीन शेळके, पोपट शेळके, सुनील शेळके, बाबासाहेब तिपायले, भाऊसाहेब फापाळे, आनंदा गायकवाड, प्रसाद वावधाने, बाळासाहेब वावधाने आदी उपस्थित होते.
---------------
अंदरसुल परिसर 
अंदरसूल परिसरात विविध संस्था, शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये 
स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
ग्रामपालिकेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील शिवाजीराव देशमुख यांचे हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मुले येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचे हस्ते, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मुली येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व माजी सरपंच चैताली रवींद्र गायकवाड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदकीय अधिकारी डॉ. आनंद तारु, लक्ष्मी महिला नागरी पंतसंस्थेत चेअरमन मंदाकिनी किसनराव धनगे व व्हाईस चेअरमन प्रमिला बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संचालिका  मंगला प्रकाश साबरे, प्रतिभा बाळासाहेब देशमुख, संगीता गणपतराव देशमुख, व्यवस्थापक मनोहर शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 
------------
राधिका इंग्लिश मिडीयम
अंदरसुल येथिल राधिका इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संस्था सचिव कुणाल धुमाळ याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यदिना निमित्ताने यावर्षी शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी डीजीटल पद्धतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सूत्र संचालन राजश्री गोसावी, आकाश खरास यांनी केले. तर वर्षा मते, अपर्णा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन वासंती खिरड, निर्मला शिकारे, दुर्गा परदेशी, सत्यजित पाटील, नासीर शेख यांनी केले होते. कार्यक्रमास प्राचार्या पलक धुमाळ, उप प्राचार्य शादाब शेख, सायली गाडीवान, पूजा झाल्टे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 
-------------
देशमाने परिसर 
देशमाने गाव परिसरात 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके तर प्राथमिक केंद्र शाळा व जनता विद्यालयातील प्रांगणातील ध्वजारोहण निवृत्त सैनिक ज्ञानेश्वर पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माळवाडी प्राथमिक शाळेत अंबादास तळेकर व प्राथमिक शाळा देशमाने (खु) प्रांगणात मुख्याध्यापक कायस्थ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मावळते सरपंच विमलबाई शिंदे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आप्पासाहेब दुघड, रतनगीर गोसावी, गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश दुघड, केंद्रशाळा मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे,  जनता विद्यालय मुख्याध्यापक राजेंद्र पाखले, आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
जळगाव नेऊर परिसर
जळगाव नेऊर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मविप्र संचलित जनता विद्यालयात माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष जयाजी नाना शिंदे यांचे हस्ते तर स्काऊट गाईड ध्वजाचे पूजनध्वजारोहण भारतीय सैन्यदलातील जवान दत्तात्रय तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक गुलाबराव कोकाटे यांनी केले. सुत्रसंचालन संपत बोरनारे  यांनी तर व आभार प्रदर्शन सुरेश शेळके  यांनी केले. कार्यक्रमास नामदेव गायकवाड, डॉ. कोकाटे, अशोक दाते, प्रकाश वाघ, तुकाराम शिंदे, कोंडाजी शिंदे, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, डी. एल. शिंदे, शिवाजी शिंदे आदीसह  शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक व ग्रामस्थ  उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत शालेय समिती अध्यक्ष भिमराव शिंदे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बाळनाथ बोराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
---------- -----------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा