येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

गुरुवार, ७ मार्च, २०१९


देशाचे संरक्षण करणाऱ्या संरक्षण मंत्रालयातुन राफेलची फाईल कशी चोरी होते ?

छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

 

निफाडदि.७ (प्रतिनिधी) : साडे पाचशे कोटीचे राफेल विमान १६५० कोटी रुपयांना का खरेदी का केले याचे उत्तर देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आता राफेल खरेदीची फाईल चोरीला गेल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याने देश का चौकीदार चौकन्ना है की नही असा सवाल त्यांनी उपस्थित करून छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.आज त्यांच्या हस्ते येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी कोळपेवाडी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळेमाजी आमदार धनराज महाले,दिलीप बनकरबाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरेकाँग्रेसचे गुणवंत होळकरअशोक गवळीविधानसभा अध्यक्ष वसंत पवारपंचायत समिती सदस्य शिवा सुराशेसंजय शेवाळे, हरिश्चंद्र भवरराजेंद्र मोगलविनोद जोशीभाऊसाहेब बोचरेभारती गवळीउन्मेष डुंबरेराजेंद्र डोखळेसुभाष कराडदत्ता रायतेसागर कुंदेउत्तमराव वाघपांडुरंग राऊतमंगेश गवळीराजाराम सानपशिवाजी सुपनरसरपंच चारुदत्त आढावसंतोष खैरनार आदी उपस्थित होते.

 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले कीमोदी सरकारने राफेल विमानाची खरेदी साडे पाचशे कोटींना न करता तब्बल १६५० कोटी रुपयांना खरेदी करत आहे.तसेच त्याचे कंत्राट एचएएल सारख्या अनुभवी कंपनीला न देता अनिल अंबानीच्या नवख्या कंपनीला दिले. याबाबत देशातील जनतेकडून विरोधी पक्षाकडून खुलासा मागितला जात असतांना आत्ता चक्क फाईल चोरीला गेल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असून घोटाळा लपविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याने चौकीदार चौकन्ना नहीं क्या असा सवाल उपस्थित केला. जर राफेलची कागदपत्रे चोरी होतात तर विकास कामाच्या कागदपत्रांचे काय होत असेल अशी उपरोधी टीका छगन भुजबळ यांनी केली.

 

ते म्हणालेसरकारकडून एकीकडे सन्मान योजनेच्या नावाखाली दोन हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले आणि काही वेळातच काढून घेतल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने जाहीर केलेली सन्मान योजना नाही तर अपमान योजना असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची पायमल्ली मोदी सरकारकडून होत असून आगामी निवडणूक ही स्वातंत्र्याची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार जनतेच्या हिताचे नाही यांना पायउतार करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.

 

महाराष्ट्रात केवळ येवला मतदारसंघातील ३८ गाव व १६ गाव पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे सुरू असून देशभरात त्याचे कौतुक झाले आहे.परराज्यातील अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी केली आहे. या योजनेबाबत नव्याने पाईपलाईन दुरुस्ती व विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी अजून पाण्याची टाकीचे काम आवश्यक आहे ते मार्गी लावले जाईल.  तसेच मतदार संघात अपूर्ण राहिलेल्या कामाचा संपूर्ण बॅकलॉक भरून काढू असे आश्वासन भुजबळ यांनी दिली.

 

यावेळी माजी आमदार धनराज महालेबाजार समितीचे सभापती जयदत्त होळकरभाऊसाहेब भवर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

भुजबळ यांचे हस्ते आज निफाड तालुक्यातील पिंपळगांव येथे पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठातण फोटो अनावरणखंडेराव महाराज मंदिर सभामंडप कामाचे भुमिपूजनशास्त्री नगर येथे भुमिगत गटार बांधणे भुमिपूजनश्रीरामनगर येथे भुमिगट गटार बांधणे भुमिपूजनशास्त्रीगनगर अंगणवाडी स्‍टोअर व किचन रुम इमारतीचे लोकार्पणमारुतीमंदिर ते वाकी रोड कॉंक्रिटीकरण करणे भुमिपूजनपिंपळग फिल्टीर वॉटर एटीएम भुमिपूजन, ब्राम्हंणगांव विंचूर येथील अल्पएसंख्यां क वस्तीपत रस्ताभ कॉंक्रिटीकरण कामाचे भुमिपूजनदलितवस्ती रस्ताा कॉक्रिटीकरण कामाचे भुमिपूजन (रु.15 लक्ष), 14 व्या वित्तआयोगातुन वार्ड क्र. 1 व 3 मध्ये (भुमिगत गटार कॉंक्रिटीकरण कामाचे लोकार्पणपाचोरे बु येथे जलयुक्त शिवार अभियान मधील बंधाऱ्याचे भूमिपूजन  देवगांव येथे ठक्कंरबाप्पाज योजनेंतर्गत अदिवासी वस्तीत बांधलेले सभागृहाचे लोकार्पणव्याापारी गाळे कामाचे लोकार्पणदलित वस्तीातील सभागृहाचे लोकार्पणअल्पमसंख्यांक वस्तींत रस्तात कॉक्रिटीकरणाचे कामाचे लोकार्पणमोठ्या ग्रामपंचायतींना नागरीसुविधा योजनेंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे लोकार्पणमोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा योजनेंतर्गत बाजारतळ कॉक्रिटीकरण कामाचे भुमीपूजनमुलभूत सुविधा योजनेंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण व भुमिगत गटार करणे कामाचे भुमिपूजन14 व्याज वित्त‍ आयोगातुन गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचे भुमिपूजनदलितवस्तीत व्याययामशाळा कामाचे भुमिपूजन करण्यात आले. तसेच देवगांव येथे जनसुविधा योजनेतुन दशक्रिया विधी शेड बांधणे कामाचे भुमिपूजनजनसुविधा  योजनेतुन ग्रामपंचायत इमारत बांधणे व 14 व्या  वित्त आयोग इमारत बांधकामाचे भुमिपूजन, 14 व्याच वित्त आयोगातुन भुमिगत गटार बांधणे कामाचे भुमिपूजनदलितवस्ती सुधार योजनेतुन भुमिगत गटार बांधणे कामाचे भुमिपूजनवनसगांव येथे मुलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पनव्यापारी गाळ्यांचे लोकार्पणवनसगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला संरक्षण भिंत भुमिपूजनलासलगांवयेथे ग्बांधलेल्या क्रिकेटफुटबॉल, योगाकबड्डी क्रीडांगणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा