येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

येवला विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात हायमास्टसाठी  १  कोटी ६  लाख

 

 

येवला, दि.२३ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातुन येवला विधानसभा मतदार संघातील हायमास्टच्या कामांसाठी १ कोटी ६ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे येवला तालुक्यातील १७ गावे हायमास्ट द्वारे प्रकाशमय होणार आहे.

 

येवला तालुक्यातील कुसुर येथे हनुमान मंदीरासमोर हायमास्ट बसविणे ३.७५ लक्षअंदरसूल येथेधनगे डेरी, आंबेडकर पुतळा व ग्रामपंचायत येथे हायमास्टसाठी प्रत्येकी ३.७५ लक्ष, नायगव्हान येथे मंदिरासमोर हायमास्ट बसविण्यासाठी ३.७५ लक्षगोरखनगर येथे हनुमान मंदिरासमोरविखरणी येथे पतसंस्थेसमोर हायमास्टबसविण्यासाठी प्रत्येकी ३.७५ लक्ष,कानडी येथे ग्रा. प. कार्यालयासमोर,कातरणी येथे विठ्ठल मंदिरासमोर हायमास्ट बसविण्यासाठी प्रत्येकी३.७५ लक्ष, लक्ष, पाटोदा येथे रामेश्वर मंदिरासमोरसोमठाणदेश येथे ग्रा. प. कार्यालयासमोर हायमास्टबसविण्यासाठी प्रत्येकी ३.७५ लक्ष,शिरसगाव लौकि येथे चौकातदेवदरी येथे बसस्टँड हायमास्टबसविण्यासाठी ३.७५ लक्षमुखेड येथे बाजारतळदेशमाने येथे गणपती मंदिरासमोर हायमास्ट बसविण्यासाठीप्रत्येकी ३.७५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

 

तसेच बोटे येथे कालेवस्ती कोंबडवाडी १ हायमास्टबसविण्यासाठी प्रत्येकी ३.७५ लक्ष,बोटे येथे ग्रा. प. समोर -दाभाडे वस्ती  हायमास्ट बसविण्यासाठीप्रत्येकी ३.७५ लक्षकोटमगाव बू येथे विठ्ठल मंदिर हायमास्टबसविण्यासाठी  २.९९ लक्ष,धामनगाव येथे हायमास्टबसविण्यासाठी २.९९ लक्ष, बोकटे जैन मंदिर गल्ली ते लोहार बाबा घर रस्ता काँक्रीटीकरण  करण्यासाठी १५ लक्ष, बोटे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १५ लक्ष,  बोटे येथे मारुती मंदिर परिसरात पेव्हरब्लॉकबसविण्यासाठी २.९९ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा