येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

येवला मतदार संघात ममूलभूत सुविधांसाठी ४ कोटी १७  लाखांची  ४८  कामे मंजूर

 

येवला, दि.२३ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा योजनेतून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातुन येवला विधानसभा मतदार संघातील विविध मुलभूत सुविधांच्या ४८ विकासकामांसाठी ४ कोटी १७ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अभ्यासिका, वाचनालय इमारत,  सामाजिक सभागृह, रस्ताकाँक्रीटीकरण, पाण्याची टाकी,स्मशानभूमी अनुषंगिक कामे, पेव्हर ब्लॉक, कब्रास्थानासाठी संरक्षण भिंतया कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

 

येवला तालुक्यातील पाटोदा येथे गावअंतर्गत काँक्रीटीकरणकरण्यासाठी १५ लक्ष, भिंगारे येथे सभामंडप बांधकाम करण्यासाठी १०लक्ष, विसापूर व रहाडी येथे वाचनालयासाठी इमारत बांधकामकरण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष, आडगाव रेपाळखरवंडीचिंचोलीबाळापुर, तांदूळवाडी, भारम, धामोडेवाघाळा, बल्हेगाव, डोंगरगावकोळम खु. येथे व्यायामशाळा बांधकामकरण्यासाठी प्रत्येकी ७ लक्ष,विखरणी येथे गावअंतर्गत काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष,नगरसूल येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे व पेव्हर ब्लॉक करण्यासाठी लक्ष, गोल्हेवाडी (नगरसूल) येथे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी लक्ष, लहीत येथे गणपती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी५ लक्ष, अनकाई (वसंतनगर) येथे सामाजिक सभागृह बांधकामकरण्यासाठी  लक्ष, कोळम खु. पाण्याची टाकी बांधकामकरण्यासाठी  लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

 

अंदरसूल येथे सामाजिक सभागृह बांधकाम (मारुती मंदिर,विश्वकर्मा) करण्यासाठी १५ लक्ष,नगरसूल येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी १० लक्ष,भायखेडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष,पाटोदा येथे आदिवासी वस्तीत सामाजिक सभागृह बांधकामकरण्यासाठी १० लक्ष, लौकीशिरसगाव येथे गावअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी  लक्ष,जळगावनेऊर येथे गावअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष,कौटखेडा येथे गावअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी  लक्ष,वळदगाव येथे गावअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ,धुळगाव येथे सभामंडप बांधकामकरण्यासाठी  लक्ष, भाटगाव येथे गटार बांधकाम करण्यासाठी १६ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.तर धानोरे येथे खंडेराव मंदिरा समोर सभामंडप बांधण्यासाठी 3 लक्ष, पारेगाव येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १२  लक्ष, उंदीरवाडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लक्ष, भाटगाव येथे गावांतर्गत गटार बांधण्यासाठी १३ लक्ष,पारेगाव येथे कब्रस्थानला वॉल कंम्पाऊंड करण्यासाठी ७ लक्ष, नांदेसर येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, धुळगाव येथे जि.प.शाळेला संरक्षण भिंत करण्यासाठी १० लक्ष, नागडे येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, आंतरवेली येथे स्मशानाभूती आनुषंगिक कामे करण्यासाठी ५ लक्ष  रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

 

तसेच निफाड तालुक्यातीललासलगाव येथे मुस्लीम कब्रास्थानासाठी संरक्षण भिंत व अनुषंगिक कामे करण्यासाठी  लक्ष,वनसगाव येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी १० लक्ष,कोटमगाव येथे रोकडोबा मंदिर सभागृह बांधकाम करण्यासाठी १०लक्ष, पिंपळगाव नजीक नंदनवन नगर येथे गावअंतर्गत काँक्रीटीकरणकरण्यासाठी १० लक्ष, विंचूर अभ्यासिका बांधकाम करणे २५ लक्ष रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा