येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

रविवार, १० फेब्रुवारी, २०१९

शिक्षणाची वारीत अंगणगाव शाळेच्या स्टाल ला उत्तम प्रतिसाद

येवला (वार्ताहर) : शालेय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाची वारी उपक्रमांतर्गत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे २९ ते३१ जानेवारी २०१९ दरम्यान पार पडलेल्या शिक्षणाची वारी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगाव स्टाल ला उत्तम प्रतिसाद मिळाला. नाशिक विभागात पार पडलेल्या या शिक्षणाच्या वारीस मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी व पालक यांनी विविध प्रकारच्या स्टालला भेटी देऊन विविध प्रकारचे उपक्रम, प्रयोग, शैक्षणिक संकल्पना समजावून घेवून कौतुक केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगावच्या स्टॉलला शिक्षण उपसंचालक शोभा खंदारे, जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षण सभापती पोपट भोळे, गजाननजी पाटिल, धुळ्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे, जळगाव येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटिल, विद्याप्राधिकरण नाशिक चे  सावंत, नाशिक विभागाच्या उपसंचालक पुष्पावती पाटील, निफाड तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय बागूल आदिंनी भेट देऊन कौतुक केले.
      राज्य स्तरीय शिक्षणाच्या वारीत सहभागी झाले बद्दल नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड, मंगला कोष्टी, केंद्र प्रमुख रमेश खैरनार यांनी वारीतील सहभागी उपक्रमशील शिक्षक गोकूळदास अरविंद वाघ, शांताराम एकनाथ शिंदे, राजेंद्र अरविंद वाघ, रंजना पांडूरंग त्र्यंबके, सविता वसंत मोरे यांचे अभिनंदन केले. वारीच्या यशस्वीतेसाठी अंगणगाव शाळेचे मुख्याध्यापक दिनकर कारभारी शिरसाठ, अंबादास सापनर, संगिता वाघ, पूनम दुकळे,  नागडे शाळेचे मुख्याध्यापक कैलास गाडे, महादेव वाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेन्द्र कोतकर आदिंचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा