येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

शनिवार, २ मे, २०२०

स्व. सोनवणे फाऊंडेशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 लाखांची मदत

येवला (विलास कांबळे)  : कोरोना विषाणू संसर्ग जगभर वाढत चालला आहे. महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, गृह विभाग कोरोना विरूध्दची लढाई लढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधिकरिता आवाहन केले आहे, त्याला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून येथील स्व. गोविंदराव नाना सोनवणे फाऊंडेशनच्या वतीने विश्वस्तांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती अंदरसूल अर्बन को - ऑप बँकेचे कार्यकारी संचालक  सुभाषराव गोविंदराव सोनवणे यांनी दिली. 
कोरोनाच्या या वैश्विक संकटात सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच मदतीसाठी सहकार महर्षी श्री. गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था, अंदरसुल अर्बन को ऑप बँक, सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे वि. का. सह. सेवा सोसायटी ली. अंदरसुल, अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा फुले समाज शिक्षण संस्था नाशिक या संस्था नेहमीच मदतीसाठी पुढे असतात. कोरोनाच्या जागतिक संकटात सर्व नागरिकांना आपली आवश्यक ती काळजी घ्या, सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन स्व गोविंदराव नाना सोनवणे फाऊंडेशनचे मकरंद सुधाकर सोनवणे,  अमोल सुभाषराव सोनवणे यांनी केले आहे. 
------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा