लासलगावच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड
लासलगाव, (प्रतिनिधी) : नुकताच आर्मी भरतीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये लासलगावमधील प्रवीण कासव, अभिषेक वाळके, प्रविण कुंदे, वैभव जाधव या चारही विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे त्यांना सागर जमधडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांचे भरतीनंतरचे प्रशिक्षण अटलरी सेन्टर अहमनगर व पुणे येथे होणार आहे. यावेळी भरतीनंतर प्रथमच त्यांचा सत्कार येथील प्रगतशील शेतकरी विठोबा न्याहारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी रवींद्र होळकर यांची ही उपस्थिती होती.यावेळी विठोबा न्याहारकर यांनी विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करून आई वडिलांचे नाव मोठे करावे व भविष्यातील वाटचालीस विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा