येवला तालुक्यातील बातमी आता जगात कोठेही पहा कधीही पहा फक्त आणि फक्त येवलान्यूज.कॉमवर येवलान्यूज.कॉम

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

पहारेकरी चोर हैं म्हणणारेच चोरांना सामील  - छगन भुजबळ

 

येवला,दि.१९ फेब्रुवारी (प्रतिनिधी) :  शिवसेना भाजप युती म्हणजे'पहारेकरी चोर हैम्हणणारेच चोरांचे साथीदार झाले असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. गेल्या दोन दिवसांपासून विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उदघाटनासाठी ते येवला दौऱ्यावर आहे. आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी माजी आमदार धनराज महालेमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,अमृता पवार,संजय बनकर,अरुणमामा थोरात,लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड,भाऊसाहेब भवर,शिवाजी सुपनरभाऊसाहेब बोचरे,विनोद जोशी,अरुण आहेर,प्रकाश वाघ,अनिता काळेसचिन कळमकर,नवनाथ काळेविश्वास आहेरअशोक महालेरतन काळेविठ्ठल कांगने,संजय पगारविश्वनाथ  सांगळे,साहेबराव आहेरपुंडलिक होंडेम्हसू भवरचंद्रकांत वाघतुळशीराम कोकाटेभाऊसाहेब कळसकर,अंबादास शिनगरआदी उपस्थित होते.

 

यावेळी छगन भुजबळ म्हणाले कीशेतकरी कर्जमाफी म्हणजे मोठा घोटाळा आहे असे म्हणणारी शिवसेना आज भाजप सोबत बसली आहे. तर वाघाचे दात मोजून घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाघाचे मुके घेतांना दिसत आहे.स्वतःला विरोधात म्हणून घेणारी शिवसेना ही सत्तेतील भागीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

आतंवाद्याकडे काळे धन आहे नोटबंदीमुळे त्यांचे कंबरडे मोडेल असे मोदींनी म्हटले होते. मात्र नोटबंदी नंतर देशावर आतंवादी हल्ले मात्र थांबत का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजही देशात सैनिक शहीद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सरकारमध्ये बसलेल्यानी काय करत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.देशातील जवान आणि किसान अडचणीत आले असून जवान धारातीर्थी पडत आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे.  देशातील १२५ कोटी जनतेच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मात्र न बोलविता पंतप्रधान पाकिस्तानात जातात ही दुर्दैवी बाब आहे. १३९ देशात जाऊन आलेल्या नरेंद्र मोदींचा एक देशही मित्र राहिला नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे एकही काम सरकारने केले नाही.कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एवढी आंदोलने केली विधानसभेत आवाज उठविला मात्र सरकारने कांद्याला केवळ दोनशे रुपये अनुदान देऊन सरकारची चेष्टा केली आहे. योजनांची नावे बदलण्याच काम युती सरकारकडून केले जात आहे. देशातील विविध प्रश्न प्रलंबित आहे. मात्र ते सोडविण्याचे काम सरकारने केले नाही. त्यामुळे याविषयी मी आवाज उठवीत राहणार असून सरकारने कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला छगन भुजबळ गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

यावेळी माजी आमदार धनराज महाले म्हणाले कीशेतकऱ्यांच्या हिताचे काम शिवसेना भाजप सरकारकडून न झाल्याने परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मांजरपाड्याचे काम रखडविण्याचे कटकारस्थान सरकारने केले. गुजरातला वाहून जाणारे पाणी वळण योजनांच्या माध्यमातून पूर्ण होऊन पाणी लवकरच उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

त्यांच्या हस्ते आज मुखेड ता. येवला येथे मुख्येमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अंगणगांव चिचोंडी खु चिचोंडी बु. सताळी भिंगारे मुखेड ते येवला तालुका हद्द रस्त्याची सुधारणा करणे  या ५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वाकद ता. निफाड येथे  स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडप रा सट्रीय पेयजल योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्यातचे जलकुंभ उद्धाटन(७५ लक्ष)१४ व्या वित्त( आयोग अंतर्गत शाळेसमोर पेव्हेर ब्लॉ क बसविणे कामाचे उद्घाटन१४ व्या‍ वित्त‍ आयोग अंतर्गत व्यायामशाळा साहीत्या पुरविणे व स्थानिक विकास निधी अंतर्गत पर्णकुटी जवळ सभामंडपशिरवाडे ता. निफाड येथे  मुलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय,स्थानिक विकासनिधी अंतर्गत दोन सभामंडप उद्घाटन व  शिरवाडे ता. निफाड येथे प्रभावतीनगर येथील अंगणवाडी इमारतीचे उदघाटन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा